जळगाव: जिल्हावासीयांची अनेक वर्षांपासूनची विमान सेवेची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. जळगाव-पुणे विमान सेवेची ट्रायल फ्लाइट ‘फ्लाय ९१’ कंपनीतर्फे शुक्रवारी २४ मे रोजी व रविवारी २६ मे रोजी करण्यात येणार आहे. पुण्यासह गोवा, हैद्राबाद आदी ठिकाणीही विमान सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे जळगावकरांना ऐन उन्हाळ्यात दिलासा देणारी ही ‘गुड न्यूज’ आहे. सात वर्षांपूर्वी जळगावात व्यवसायिक विमान सेवा सुरू करण्याबाबत हालचाली झाल्या होत्या. विमानळाच्या उद्घाटनापूर्वी प्रवाशांना विमान सेवा पुरविणाऱ्या विमान कंपनीने फ्लाईट सुरू करण्याची घोषणाही केली होती.
मात्र त्यानंतर काही कारणास्तव या विमान सेवेला मुहूर्तच लागला नाही. ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने जळगाव-पुणे तिकीट विक्रीस प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रवाशांचा पुणे येथे शैक्षणिक कामानिमित्त व उद्योजकांना जावे लागते. अनेक वर्षांपासून जळगावकरांकडून विमान आहे.सेवेची मागणी होती. मात्र ट्रायल स्वरुपात का? होईना विमान सेवा सुरू होत असल्याने खान्देशातील जनतेला सुखद धक्का देणारी ही वार्ता