मुंबई : जळगावमधील राहणाऱ्या एक तरुणाने भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला देणाऱ्या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. या तरुणाचे नाव गौरव पाटील असे आहे. तो मूळ जळगाव मधील आहे व त्याने मुंबईच्या नेव्हल डॉक यार्डमध्ये सहा महिन्यांचे शिकाऊ शिक्षण घेतले आहे, या माहितीच्या बदल्यात त्याने पैसे स्वीकारल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार, पाटीलसह त्याच्या संपर्कात असलेल्या तिघांविरोधात एकूण चार जणांविरुद्ध यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात त्याने मुंबई येथे आयटीआयचे शिक्षण घेतले असून ढे नेव्हल डॉक यार्डमध्ये त्याने ६ महिन्यांची अॅप्रेंटिसशिप केली होती.
येथूनच त्याने महत्त्वपूर्ण माहिती शेअर केल्याचा संशय एटीएसला आहे. तो ठाणे परिसरात भाडेतत्त्वावर एकटाच राहण्यास होता.ठाण्यातील एक संशयित पाकिस्तानातील गुप्तचर विभागातील हस्तकाला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती देत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने पाटीलला ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा, एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत फेसबुक व व्हॉट्सअॅपद्वारे पैसे घेतल्याचे समोर आले आहे. A.T.S पाकिस्तानातील दोन हस्तकांशी ओळख झाली होती. याच ओळखीतून त्याने गोपनीय व संवेदनशील माहित पुरवली.