जळगाव : शहरातील टेलिफोन नगरातील व्यापाऱ्याला रसायन व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने पाच लाख ६४ हजारांचा गंडा घालण्यात आला. यासंदर्भात सायबर पोलिसात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. जळगाव पोलिसांनी सायबर माहिती अशी की, आश्विन केशवलाल पटेल (४०, रा. टेलिफोन नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. २७ नोव्हेंबर ते १० जानेवारी दरम्यान त्यांना फेसबुकवरील व्हिक्टोरिया ओव्हेन यांनी त्यांच्याशी व्हॉट्सअॅप क्रमांकावरून संपर्क साधला.
त्यांनी एका रसायन कंपनीत गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि त्यांचा विश्वास संपादन करून आश्विन पटेल यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने पाच लाख ६४ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आश्विन पटेल यांनी रोजी सायंकाळी सात जळगाव येथील सायबर वाजता पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यावरून सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील करीत आहे.