---Advertisement---

जळगावच्या सराफा बाजारात चोरीचा प्रयत्न फसला; चोरटे सीसीटीव्हीत कैद

by team
---Advertisement---

जळगाव : शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाला मात्र सुदैवाने सायरन वाजताच चोरटे दुचाकी सोडून पसार झाले. ही घटना शनिवारी पहाटे सराफ बाजारातील मारवाडी व्यायामशाळेजवळ घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सायरन वाजताच चोरठ्यांची धूम मारवाडी व्यायामशाळे जवळ अनिल इंगळे यांचे पद्मावती गोल्ड सोने-चांदीचे दागिने घडविण्याचे दुकान आहे. शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचे कपडे आणि डोक्यात टोपी घातलेले चार चोरटे त्यांच्या घराजवळ आले. त्यांनी घराच्या बाहेरील बाजूला लावलेले लोखंडी अँगल कापले. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजाला लावलेले सायरन वाजल्याने मोठ्या आवाजामुळे र घरात झोपलेले इंगळे यांच्यासह परिसरातील नागरिकांना जाग आली. सायरनचा आवाज होत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. दुकान फोडण्यापूर्वी चोरट्यांनी आर. वाय. पार्क परिसरातून दुचाकी चोरली होती. त्या दुचाकीवरून ते चोरी करण्यासाठी गेले. परंतु, सायरन वाजल्यामुळे चोरट्यांनी आणलेली दुचाकी तेथेच सोडून ते पसार झाले. पोलिसांनी ही दुचाकी जप्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment