जळगावातील महासंस्कृती मोह्त्सवात आर्चीला धक्काबुक्की, रिंकू राजगुरुचा चाहत्यांवर संताप अनावर

जळगाव : शहरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाचा मोठ्या जल्लोषात समारोप झाला. या समारोप कार्यक्रमाला सैराट या चित्रपटाची अभिनेत्री रिंकू राजगुरू यांची उपस्थिती होती.

पाच दिवसांपासून सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमास अभिनेत्री रिंकू राजगुरु हिची विशेष उपस्थिती होती. यावेळी आर्चीने सैराट चित्रपटातील डायलॉग म्हणत तसेच गाण्यांवर नृत्य करत जळगावकरांची मने जिंकली. परंतु यावेळी कार्यक्रमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला भेटण्यासाठी चाहात्यांची मोठी गर्दी केली. गर्दीत रिंकू राजगुरु हिला धक्काबुक्की झाली. त्यानंतर रिंकू राजगुरुचा संताप आनावर झाला.

त्या गर्दीत एका चाहत्याने तिचा हात पकडला. त्यावेळी आर्ची चांगलीच संतापली. तुमच्या मुलीला कोणी धक्काबुक्की केल्यास तुम्हाला चालेल का ? अशा शब्दात रिंकू राजगुरूने चाहत्यांना खडेबोल सुनावले.