तरूण भारत लाईव्ह । जळगाव : हिंदू व ख्रिश्चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून लव्ह जिहादच्या माध्यमातून अत्याचाराला बळी पडणार्या मुलींच्या जीवनावर सत्य घटनावर आधारीत द केरल स्टोरी हा चित्रपट प्रर्दर्शित झाला आहे. हा चित्रपट शनिवार ६ मे रोजी जळगाव येथील नटवर थिएटरमध्ये तीन शो मध्ये ८०० महिलांना दाखवण्यात आला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्यावतीने या चित्रपटाचे मोफत आयोजन करण्यात आले होते. चित्रपट पाहण्यासाठी महिलांचा व युवतीचा प्रचंड प्रतिसाद लाभला. त्यामुळे जळगावात पहिल्याच दिवशी चित्रपटगृहे हाऊसफुल्ल झाली होती. हा चित्रपट समाजात जनजागृती करण्यासाठी व लव जिहादला बळी पडणार्या मुलींसाठी हा चित्रपट एक दूरगामी संदेश देईल असे मत आमदार सुरेश भोळे यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर व्यक्त केले. याप्रसंगी भाजपा महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, नगरसेवक विशाल त्रिपाठी, माजी महापौर सीमाताई भोळे, महिला अध्यक्ष दीप्ती चिरमाडे व पदाधिकारी उपस्थित होते. समाजात जनजागृतीसाठी हा चित्रपट टॅक्सी फ्री करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांना केले आहे. शहरातील सामाजिक संघटना आणि महिला मंडळ यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहन व आवाहन करावे. विशेषत: कॉलेजच्या युवतींना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी केले आहे. उद्या ७ मे रोजी १८ वर्ष वय असलेल्या फक्त मुलींसाठी हा चित्रपट मोफत दाखविण्याची व्यवस्था आमदार सुरेश भोळे यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचे भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांनी सांगितले.