जळगाव: सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने नवीन विक्रम नावावर नोंदवला होता. जळगाव सुवर्णपेठेत सोन्याने 75 हजारांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, आता किंमतीत मोठी घसरण आली आहे. गेल्या पाच दिवसात सोन्याचे भाव २९०० रुपयांनी घसरले आहे. दुसरीकडे चांदी दरात देखील मोठी घसरण झाली आहे.
२५ मे रोजी पुन्हा २०० रुपयांची घसरण होऊन ते ७२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर आले. शेअर बाजार उसळी घेत असल्याने तिकडे गुंतवणूक वाढत असल्याने सोन्याचे भाव कमी होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. चार दिवसांपासून चांदी मात्र ९३ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे.