जळगाव : शहरातील पिंप्राळा परिसरातील स्वस्त धान्य दुकानाला मंगळवार, सकाळी ५ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात दुकानात ठेवलेले अंदाजित ४०-५० हजार रुपयांचा माल जळून खाक झाल्याचा अंदांज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, किरण प्रभाकर कोळी यांचे पिंप्राळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर जवळ सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान आहे. त्यांच्या दुकानाला सकाळी ५ वाजेच्या सुमारास आग लागली. याबाबत पुंडलिक कलाल यांनी अग्निशमन विभागाला फोनद्वारे ६.१५ वाजता माहिती दिली.
खबर मिळताच अग्निशम विभागाचे जवान हे अग्निशम अधीक्षक शशिकांत बारी यांच्या सूचनेनुसार तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. या अग्निशम दलाच्या जवानांनी १५ -२० मिनिटात ही आग आटोक्यात आणली.
या आगीत दुकानात असलेले तेलाचे पाऊच, डाळ व इतर साहित्य जळून खाक झाली. आग विझवण्यासाठी अग्निशम दलाचे कर्मचारी वाहन चालक देविदास सुरवाडे, भगवान पाटील, योगेश पाटील, इकबाल तडवी यांनी प्रयत्न केले.
दरम्यान, यावेळी गल्लीतील नागरिकांनी देखील आग विझविण्यास मदत केली. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची प्राथमिक अंदांज व्यक्त करण्यात येत आहे.