जळगाव : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी रविवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड जळगाव येथे लॉटरी (ड्रॉ), निरीक्षकांच्या उपस्थितीत इन कॅमेरा होणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी दिली.
राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना भारतातील तीर्थ क्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील इच्छूक जेष्ठ नागरिकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तीर्थ दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त असून, प्रत्येक जिल्ह्यासाठी शासनाने कोटा निश्चित केला आहे. कोट्या पेक्षा जास्त अर्ज आल्यास लॉटरीव्दारे प्रवाशांची निवड केली जाईल. शिवाय अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी केली जाईल.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी २२ सप्टेंबररोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड जळगाव येथे लॉटरी सोडत निरीक्षकांच्या उपस्थितीत इन कॅमेरा होणार आहे. असे सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी सांगितले.