जळगाव : गणेश कॉलनी परिसरात असलेल्या महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात असलेल्या ट्रॅकवर चक्क घोडेस्वारी चालत आहे. याम ळे उद्यानात येणाऱ्यांना ट्रॅकवर चालता येत नाही. जर काही कारणांमुळे घोडा उधळला तर होणाऱ्या नुकसानीस किंवा जीवीतहानीस कोण जबाबदार राहील असा प्रश्न आता उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे.
गणेश कॉलनी परिसरातील ख्वॉजा नमिया दर्याजवळ महापालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे. सुस्थितीत असलेल्या या उद्यानातील काही भाग हा करारावर खासगी संस्थेला खेळण्यांसाठी दिलेला आहे. तर व्यवस्थापनाचे काम हे ज्येष्ठ नागरीक संस्थेला दिलेले आहे. उद्यानात चारही बाजुने जॉगींग ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे. या उद्यानात सायंकाळी लहान मुलांसह वयोवृध्दांची गर्दी होत असते. उद्यान हिरवेगार असल्याने व लहान म लांना खेळण्यासाठी पुरेशी मोकळी जागा व खेळणे असल्याने ते उद्यानात मुक्तपणेखेळत असतात.
घोडेस्वारीचे अर्थकारण
उद्यानात येणारी लहान मुले पाहता येथे काही खासगी घोडेमालकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. ते थेट उद्यानात घोडे नेत लहान मुलांना वीस ते पंचवीस रूपये घेवून दोन ते तीन राऊंड मारत असतात. मूळात उद्यानामध्ये कोणत्याही प्राणी नेण्यास मनाई असताना या उद्यानात मात्र सर्रासपणे घोडे व खासगी पाळीव कुत्रे नेण्यात येत आहे. याठिकाणी महापालिकेतर्फे सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु तेही उद्यानात प्राणी नेण्यास प्रतिबंध घालत नाही