रेल्वे: जळगाव जिल्यातील नागरिकांसाठी एक खुशखबर आहे.जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी आणखी एक नियमित रेल्वे गाडी मिळणार आहे.नांदेड वरून मुंबईला जाणारी द्विसाप्ताहिक विशेष एक्सप्रेस गाडी लवकरच ऑक्टोबर महिन्यात नियमित होणार आहे.
पण याबाबत मध्य रेल्वे भुसावळ विभागाला अजून देखाली या गाडीबाबत सूचना मिळाल्या नाहीय. हुजूर साहिब नांदेड-एलटीटी- हुजूर साहिब नांदेड ही एक्स्प्रेस गाडी चालविण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या ऑक्टोबर महिन्याच्या नवीन वेळापत्रकात या गाडीचा समावेश होणार असल्याने जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांनादेखील या गाडीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. परंतू जळगाव जिल्ह्यातील भुसावळ व चाळीसगाव या दोनच रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा असणार आहे.
या ठिकाणी थांबेल रेल्वे
नांदेड-एलटीटी या एक्सप्रेस गाडीला पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण स्थानकांवर थांबा असणार आहे.
असे असेल वेळापत्रक
गाडी क्र. १७६६५ नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस नांदेड येथून दर सोमवारी रात्री २१:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १४:२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
तर गाडी क्र. १७६६७ नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस दर बुधवारी नांदेड येथून रात्री २१:१५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी १३:०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. १७६६६ एलटीटी-हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस दर मंगळवारी एलटीटी येथून १६:४० वाजता प्रस्थान करून दुसया ८:१० वाजता नांदेडला पोहचेल.
गाडी क्र. १७६६८ एलटीटी- हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस दर गुरुवारी एलटीटी येथून १६:५५ वाजता प्रस्थान करून दुसऱ्या ९:०० वाजता नांदेड येथे पोहोचणार आहे.