जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांचा आज एकदिवसीय बंद, 8 ते 10 कोटींची उलाढाल ठप्प

जळगाव:   राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या धोरणामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याने त्याविरोधात राज्यभरातील सर्व बाजार समिती यांचा आज एकदिवसिय बंद करण्यात आला आहे. या कृषी बाजार समितीच्या बंदमुळे जिल्यातील रोजची होणारी 8 ते 10 कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे  मिळत आहे. कृषी बाजार समितीची दोन्ही बाजूची प्रवेश द्वार ठेवण्यात आली आहेत.

राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धोरणांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे याविरुद्ध राज्यभरातील सर्व बाजार समिती आज बंद ठेवण्याचं राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील बारा बाजार समिती सुद्धा बंद मध्ये सहभागी असून सर्व बाजार समिती आज बंद राहणार आहे. शेती माल तसेच इतर सर्व कामे आज बंद राहणार आहे.