जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; चक्कर येऊन पडल्याने मृत्यू

जळगाव: जिल्ह्यात तापमानात दिवसेंदिवस वाढत आहे. या कडक उन्हानामुळे जीवनमान विस्कळीत झाल आहे. उष्मघाताचा जिल्ह्यात पहिला मृत्यू झाला आहे. करमाड, ता. पारोळा येथील अर्जुन भगवान पाटील या शेतकऱ्याचा चक्कर येऊन पडल्याने शेताच्या बांधावरच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी अर्जुन पाटील हे रविवारी सकाळी करमाड शिवारातील आपल्या शेतात गेले होते. तिथे बांधावर काम करीत असताना त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यांना लागलीच पारोळा येथील कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यावरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.