जळगाव जिल्ह्यात टंचाईच्या झळा, धरणांमध्ये इतकेच आहेत टक्के जलसाठा

जळगाव :  जिल्ह्यातील धरणांमध्ये सद्यःस्थितीत केवळ ५७ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध असून १६ टँकरद्वारे १५ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मागील वर्षी हाच उपयुक्त जलसाठा ७१.०७ होता. जिल्ह्यातील धरणांमध्ये सद्यःस्थितीत केवळ ५७ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे.

यामुळे उन्हाळ्यातील टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर्षी जिल्ह्यात पावसाची प्रदीर्घ ओढ, काही भागांत अतिवृष्टी, पावसाअभावी वाया जात असलेला खरीप हंगाम, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. याचा पिकांच्या वाढीसह उत्पादनावरही काहीअंशी परिणाम झाला आहे. रावेर तालुका वगळता.यावर्षी अन्य काही तालुक्यांत पावसाने जेमतेम सरासरीही गाठलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात १४ तालुक्यांतील काही मंडळांत दुष्काळसदृश्य परिस्थिती दिसून येत आहे.

पारा ३३ अंशाचा पुढे
जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.. पारा ३३ अंशांच्या पुढे सरकला आहे. दरवर्षी सरासरी पर्जन्यम ान असलेल्या चाळीसगाव तालुक्यात ऐन पावसाळ्यात आणि हिवाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. सध्यास्थितीत १६ टँकरद्वारे १५ गावांना पाणीपुरवठा होत आहे. मन्याड मध्यम प्रकल्प कोरडाच यावर्षी आजपर्यंत केवळ ५७.७१ टक्के उपयुक्त मोठ्या, जलसाठा आहे. यामुळे मध्यम व लघु प्रकल्पांतील जलसाठा १३.३६ टक्क्यांनी कमी आहे. यंदा मन्याड मध्यम प्रकल्प कोरडाच आहे.. यातून उन्हाळ्यात टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे.

 

 

जळगाव जिल्हयात टंचाईच्या झळा,