जळगाव जिल्ह्यात टंचाईच्या झळा तीव्र ४२ गावांना ५१ टँकरद्वारे पाणी पुरवठा

जळगाव :  जिल्ह्यात पाणी टंचाई समस्या तीव्र स्वरूप धारण करीत आहे. प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, विहीर अधिग्रहण करणे असे विविध उपाय हाती घेण्यात येत आहेत. जिल्ह्यात मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात ठेका दोघा मक्तेदारांना देण्यात आला आहे. हा पाणीपुरवठा त्यांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबरपर्यंत करावयाचा आहे. टँकर व्दारे पाणीपुरवठा करण्याचा मक्ता शासनाकडून मेसर्स रोहित एन्टरप्रायझेस (गोकुळ कॉलनी, राहुरी ता. राहुरी जि. अहमदनगर) व श्रीकांत वसंतराव जनधने (रा. उकलगाव ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर) यांना देण्यात आलेला आहे.

मक्तेदाराव्दारे टँकर भाडे हे प्रती दिन १ मेट्रीक टन पाण्यासाठी २७० रूपये, प्रती किलोमीटर ३ रूपये ४० पैसे आकारणी करीत आहेत. रोहन एन्टरप्रायझेस ७ तालुक्यांना तर श्रीकांत वसंतराव जनधने ६३ विहीरी केल्या अधिग्रहीत जिल्ह्याला पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दहा दिवसांपूर्वी २९ गावांना ३३ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. हा पाणी पुरवठा आता ४२ गावाना ५१ टँकरव्दारे करण्यात येत आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाई समस्या उग्र रूप धारण करत आहे. दहा दिवसांपूर्वी ४१ गावांमधील ४६ विहीर अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. आता हीच संख्या ५७ गावांमधील ६३ विहीर अधिग्रहीत करण्यापर्यंत पोहचली आहे.
८ तालुक्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

चाळीसगाव तालुक्यात ३१ टँकरद्वारे पाणी पुरवठा
जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. चाळीसगाव तालुक्यातील २६ गावांना ३१ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून २२ गावांमधील २६ विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. अमळनेर तालुक्यातील १२ गावांना १६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून १३ गावांमधील १४ विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. भडगाव तालुक्यात २ गावांना व पारोळा तालुक्यात १ गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. भडगाव व पारोळा तालुक्यात प्रत्येकी ३ गावांमध्ये विहीर अधिग्रहीत करण्यात आली आहे.