जळगाव जिल्ह्यात प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन,या तारखे पासून होणार सुरवात

जळगाव : जिल्ह्यातील वडनगरी येथे भाविकां कडून व मंदिर ट्रस्ट कडून शिव महापुरान कथेचे आयोजन केले जात आहे. हे आयोजन वडनगरी येथील बड़े जटाधारी महादेव मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे,मिळालेल्या माहितीनुसार ,या शिव महापुरान कथेच्या तयारीला वेग आला असून, ३०० एकर शेतात कथेचे केले जात आहे.कथा ५ ते ११ डिसेंबरदरम्यान वडनगरी फाट्याजवळ होणार कथा वाचक म्हणून पंडित प्रदीप मिश्रा येणार आहेत. कथेचे आयोजन भरत चौधरी, जगदीश चौधरी, तुषार चौधरी यांच्यासह पंचकोशीतील शिवभक्तांकडून करण्यात आले आहे. ७ लाखापेक्ष्या जास्त लोक येण्याची शक्यता आहे.

५ ते ११ डिसेंबर दरम्यान अशी राहील कथा?
५ ते ११ डिसेंबरदरम्यान दररोज दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान शिवमहापुराण कथेचे वाचन केले जाणार आहे.
४ डिसेंबर रोजी कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचे जळगाव शहरात आगमन होणार असून, ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव रेल्वे स्टेशन ते वडनगरी फाट्याजवळील बड़े जटाधारी महादेव मंदिरापर्यंत प्रदीप मिश्रा यांची शोभायात्रा काढण्यात येणार असून, वा शोभायात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे.