जळगाव : जिल्हा बँक दरवर्षी शेतकऱ्यांना १२०० कोटींपेक्षा अधिक पीक कर्ज वितरीत करीत असते. शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसू नये यासाठी जिल्हा बँकेने जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या १ लाख ९० हजार शेतकऱ्यांचे पीक कर्जावरील ७० कोटी ४० लाखांचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.ते पुढे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांना एप्रिल २०२३ रोजी कर्ज घेतले आणि ३१ मार्च २०२४ पर्यंत कर्जाची परतफेड करतील अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असत्याचे पवार यांनी सांगितले.
यासंदर्भात जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आर्थिक वर्षात पीक कर्ज घेतलेल्या शेतकयांनी फक्त मुद्दल कर्जाची रक्कम भरायची आहे. त्यांना बँकेकडून व्याज माफ करण्यात आले असून त्यांचा फायदा जिल्हाभरातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी यापूर्वीच नियमित पीक कर्जाची व्याजासकट मुद्दल भरली आहे. अशा शेतकयांनाही बँकेकडून काय?
लाभ देता येईल याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. फेड ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच केली आहे. त्यांच्यासाठी काही सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक १८ मार्च रोजी नियमित कर्ज रोहित निकम उपस्थित होते.
जिल्हा बँकेने शून्य टक्केप्रमाणे शेतकऱ्यांकडून पीक कर्जावर
व्याज आकारणी करण्याचे आदेश प्राप्त झाले असून त्याचा लाभ जिल्हाभरातील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त मुद्दल भरावी लागणार आहे. मध्यंतरी केद्र सरकारने आदेश काढले होते की. बँकेने पीक कर्जाचे व्याज शेतकऱ्यांकडून घ्यावे आणि त्यांनतर शासनाकडून व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर परत दिली जाईल. मात्र यासंदर्भात सहकार खात्याचे मंत्री तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील व्याज माफीचा प्रश्न सुटल्याचे संजय पवार यांनी सांगितले.