---Advertisement---

जळगाव : नैराश्यातून गळफास घेत संपविले जीवन…

by team
---Advertisement---

जळगाव : तालुक्यातील शिरसोली गावात एका ४० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली. आली आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून तरुणाने नैराश्यातून गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, समाधान बंडू कोळी (वय ४०) रा. शिरसोली हा मागील एक वर्षापासून पत्नी, दोन मुले यांच्यासह वास्तव्यास असून समाधान कोळी हे एका खाजगी कंपनीत काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. मागील काही दिवसांपासून ते नैराश्येत होते. दरम्यान २६ मार्चला सकाळी तो कंपनीत नाईट शिफ्ट करून कामावरून घरी आले. यानंतर दरवाजा बंद करून त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली. पतीने आत्महत्या केल्याचे समजताच पत्नीने आक्रोश केला. यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान कोळी याना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment