जळगाव : जिल्यातील कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी सराईत पोलीस प्रसाशन सज्ज झाले आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना चाप लावण्याचे काम सुरू केले आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करून चार नव्या गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने हद्दपार केलेले चौघे गुन्हेगार हे जामनेर तालुक्यातील आहेत. यात इरफान लालखा तडवी ( वय २७, रा. पहूर, ता. जामनेर ); शाहरूख बनेखा तडवी ( वय ३३, रा. पहूर); प्रदीप रायदास पाटील (वय २४, रा. पहूर) आणि शेख राज शेख समद (वय २४, रा. पहूर) या चौघांचा समावेश आहे. या चौघांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. चोरी, लुटमारी अशा अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याने त्यांच्यावर ही कार्यवाही करण्यात आली आहे