जळगाव : येथील सुप्रीम काॅलनी येथील झमझम नगर इदगाह दर्गा या परिसरातील नागरिकाना पाण्याची दोन वर्षांपासून मोठी समस्या भेडसावत आहे. ही समस्या, आठ दिवसात सोडविली नाही तर मनपा समोर मुलाबाळासह, नागरिकासह उपोषण करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पार्टी महानगरतर्फे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सुप्रीम काॅलनी येथील झमझम नगर इदगाह दर्गा या परिसरात पंधरा ते वीस दिवस पाणी येत नाही. यासंदर्भात वारंवार निवेदन देण्यात आले आहे. यापरिसरातील नागरिकाचा मोठ्या प्रमाणात रहिवास असून या ठिकाणी मनपा कोणतीही नागरिक सुविधा देत नाही. नागरिक मनपाचा कर नियमित भरत आहेत. परंतु, महापालिकेतर्फे रस्ते, लाईट, गटार, साफ-सफाई, घंटागाडी, पाणी समस्या सोडविण्यात येत नाही. या समस्या आठदिवसात लवकरात लवकर सोडवा अन्यथा मनपासमोर मुलाबाळासह, नागरिकासह उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे,. निवेदन देतांना राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पार्टी महानगर जळगाव जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी , राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यक शरदचंद्र पवार महानगर जिल्हाअध्यक्ष व माजी नगरसेवक डॉ. रिजवान खाटीक , महानगर जिल्हाउपंअध्यक्ष किरण राजपूत, महानगर जिल्हासरचिटणीस व माजी नगरसेवक सुनिल माळी, माजी नगरसेवक प्रशांत नाईक, महानगर चिटणीस नंईम खाटीक, महानगर सरचिटणीस सुहास चौधरी या परिसरातील महिला व नागरिक यांनी दिला आहे.