जळगाव : जळगाव रेल्वेस्थानकाला भुसावळ येथील डीआरएम इति पाण्डे यांनी दोन महिन्यांपूर्वी भेट देऊन पाहणी केली होती.यात दादऱ्यावरील लोखंडी पट्ट्यांमध्ये पाय अडकून प्रवासी पडत असल्याच्या तक्रारीवरून या पायऱ्यांवर लोखंडी पट्टया काढण्याच्या सूचना डीआरएम यांनी दिल्या होत्या. त्यानुसार दादऱ्याच्या दुरुस्तीच्या कामांना रेल्वेस्थानकावर सुरुवात झाली आहे. जळगाव येथील रेल्वेस्थानका प्रवासी लोखंडी पट्टयांमध्ये पाय अडकून पडत असल्याच्या घटना घडत होत्या.दोन महिन्यांपूर्वी पाहणी दोन महिन्यांपूर्वी जळगाव रेल्वेस्थानकाची पाहणी डीआरएम इति पांडे यांनी केली होती. यावेळी दादऱ्यावरील पायऱ्यांवरील लावलेल्या लोखंडी पट्ट्या काढण्याच्या सूचना दिलेल्या होत्या.त्यानुसार प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोनवरील दादऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला दोन दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे.
आता प्रवाशांचा त्रास कमी होणार.लोखंडी पट्टीत अडकत होते पाय पायऱ्यांवर आता मार्बल बसवले जाणारा आहे, रेल्वेस्थानकातील दादऱ्याच्या पायऱ्या चढताना व उतरताना प्रवाशांचे पाय घसरू नये म्हणून पायऱ्यांच्या पुढे लोखंडी पट्ट्या लावल्या आल्या होत्या काही वेळाने या पट्ट्या वर आल्याने प्रवाशांचे उतरताना व चढताना त्यात पाय अडकत होते. त्यामुळे अनेक वेळा प्रवासी पडत असल्याच्या घटनादेखील घडल्या होत्या. त्यामुळे या लोखंडी पट्ट्या काढून पायऱ्यांचे काम करण्याच्या सूचना डीआरएम यांनी दिल्या होत्या.