जळगाव : शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत, अश्यातच शहरातील भवानी पेठ परिसरात चोरीचा प्रयत्न उघडकीस आला आहे, याप्रकरणी सोमवार २६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारिया जोझर बदामी ही महिला भवानी पेठमध्ये वास्तव्याला आहे, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना संशयित आरोपी अमजद इकबाल खान याने बनावट चावीच्या मदतीने घराचे लॉक उघडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात महिलेने सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी अमजद इकबाल खान यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास रवींद्र परदेशी हे करीत आहे.