जळगाव : आता थंडीला सुरवात होताना पाहिला मिळत आहे. हवेत गारवा वाढत आहे, तसेच चांगलाच गारठा निर्माण झालेला असून, रात्रीचे तापमानही घसरलेले आहे. जळगाव शहरात १३ तारखेला किमान तापमानाची नोंद १५ किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तस पाहिला गेलं तर नोव्हेंपासूनच हवेत गारठा निर्माण होत असतो. मात्र, यावर्षी नोव्हेंबरमध्ये थंडी पडण्याऐवजी उन्हाळ्यासारखे गरम होत होते. नोव्हेंबरच्या शेवटच्या व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने, ऐन डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडी गायब झालेली होती. दरम्यान आता थंडीचा कडाका वाढायला सुरुवात झालेली आहे.तसेच रात्रीच्या वेळेस जळगावातील रस्त्यांवरती लवकर शुकाशुकाट पाहिला मिळत आहे. गुलाबी थंडीचे प्रमाण वाढताच सकाळच्या प्रहरी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्याचे प्रमाणही वाढलेले आहे.