जळगाव: मार्च महिन्यात सोने आणि चांदीच्या भावात मोठयाप्रमाणात चढउतार झाल्याचे पाहिला मिळत आहे. मागच्या महिन्यात सोन्याचे भाव 66 हजार रुपयांवर होते. मार्च महिन्यात सोन्याच्या भावाततब्बल चार हजार रुपयांची वाढ झाली आहे. आज रोजी सोन्याच्या भावात झालेल्या एक हजार रुपयांच्या वाढीमुळे जळगाव शहरातील सुवर्ण नगरीमध्ये ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात जळगावात 22 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 60,260 रुपये प्रति तोळे इतका होता.
जळगावातील आजचे भाव?
आजचा सोन्याचा भाव आहे गोल्ड 24 कॅरेट 66,700
गोल्ड 22 कॅरेट 61 हजार 100
गोल्ड 18 कॅरेट 50 हजार 25
या सर्वांवर तीन टक्के जीएसटी एक्स्ट्रा लागणार आहे.