जळगाव : हातात तलवार घेऊन माजवत होता दहशत…पोलिसांनी केली अटक

जळगाव: शहरातील लक्ष्मीनगर परिसरात तलवार घेऊन दहशत माजाविणाऱ्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. आदेश पांडुरंग सपकाळे अस अटक केलेल्या तरुणाच नाव आहे.

याबाबतची माहिती अशी कि, शहरातील लक्ष्मी नगर भागातील हनुमान मंदिर परिसरात आदेश हा हातात तलवार घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यात मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आदेश याला अटक केली. त्याच्याकडून तलवार आणि गुन्ह्यात वापरलेली कार क्रमांक (एमएच ०३ सीएम ९५९) जप्त करण्यात आली.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आदेश सपकाळे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.