जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा आणि मतदानाचे कर्तव्य बजवा, असे आवाहन रेडिओ मनभावन ९०.८ एफएमच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मतदारांना केले. ते ‘रेडिओ मनभावन’ला दिलेल्या भेटीदरम्यान मुलाखतीच्या माध्यमातून बोलत होते. याप्रसंगी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. रेडिओ मनभावन’चे संचालक आर. जे. अमोल देशमुख यांनी मतदान प्रक्रियेविषयी आयुष प्रसाद यांच्याशी दीर्घ मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधला. मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध १८ वर्षावरील तरुण-तरुणींना पहिल्यांदा मतदानाचा अनुभव घेता येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा म तदारसंघातील मतदान केंद्रांवर सुसज्ज अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मतदानासाठी येणाऱ्या महिलांसोबतच्या बालकांसाठी बालसंगोपन केंद्र, पिण्याचे स्वच्छ पाणी,
स्वच्छतागृहाची सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, ‘रेडिओ मनभावन’च्या विविध कार्यक्रमांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. युनिसेफ, स्मार्ट नवी दिल्लीद्वारा प्रायोजित कार्यक्रम ‘प्राधान्य द्या शिक्षणालाः नकार द्या बालविवाहाला’ या उपक्रमाची माहितीदेखील त्यांनी घेतली. बालविवाह होत असेल तर १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच ‘रेडिओ मनभावन’ अनेक सामाजिक, जनजागृतीपर करत असलेल्या कार्यक्रमांबाबत सुध्दा त्यांनी कौतूक केले. यावेळी ट्रान्समिशन ऑपरेटर राहुल पाटील, सहाय्यक साहिल गायकवाड, मूळजी जेठा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी नीलम पाटील, अश्विनी राठोड उपस्थित होत्या.
मतदानासाठी १२ प्रकारचे पुरावे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्विपच्या कार्यपद्धतीची विस्तृत माहिती दिली. तसेच ईव्हीएम हे अत्यंत सुरक्षित असून कोणीही त्याबद्दल शंका घेण्याचे कारण नाही, असेही त्यांनी नमूद केले. म तदारांना मतदानासंदर्भात काही अडचण असल्यास त्यांनी १९५० या हेल्पलाइन संपर्क साधावा. ते आपली अडचण दूर करू शकता. आचारसंहिता भंग किंवा निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही चुकीचे घडत असल्याची शंका आल्यास अॅपद्वारेदेखील आपण प्रशासनाकडे तक्रारी नोंदवू शकता. मतदान ओळखपत्र सोबतच १२ प्रकारचे पुरावे म तदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे १३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजे दरम्यान नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहनही आयुष्य प्रसाद
यांनी केले.