जिल्हा दूध उत्पादक संघात सरळ लढतीचे संकेत

 

रामदास माळी

जळगाव : जिल्हा दूध उत्पादक संघासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. दूध उत्पादक संघात गेल्या काही महिन्यांपासून माजी मंत्री तथा आ. एकनाथराव खडसे आणि भाजपचे आ. मंगेश चव्हाण यांच्यातील राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र आता निवडणुकीचे बिगूल वाजल्याने दूध संघ निवडणुकीत राजकीय संघर्षामुळे दोन पॅनलमध्ये सरळ लढत होण्याचे संकेत मिळत आहे.

जिल्हा दूध संघासाठी ३१ ऑक्टोबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन फटका फुटला. दिवाळी संपताच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. दूध संघात मध्यंतरी मुख्य प्रशासक म्हणून आ. मंगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र त्यानंतर दूध संघाच्या चेअरमनसह संचालक मंडळाने त्यास न्यायालयात आव्हान देऊन पुन्हा संचालक मंडळास मुदत मिळाली होती. न्यायालयाकडून संचालक मंडळ कायम करण्यात आले ह…

११ डिसेंबरला होणार फैसला

जिल्हा दूध संघासाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. नामनिर्देशन ३ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबरपर्यंत दाखल करता येईल. उमेदवारांच्या अर्जांची छाननी ११ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. मतदान जिल्ह्यातील १५ तालुक्यांच्या ठिकाणी १० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे. मतदानानंतर ११ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन दूध संघ निवडणुकीचा फैसला होणार आहे.

सर्वपक्षीय पॅनल चालेल, पण आ.खडसे नकोत : आ. मंगेश चव्हाण

दूध उत्पादक संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणुकीतील पॅनलबाबत मंत्री गिरीश महाजन निर्णय घेतील. दूध संघ निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलबाबत भूमिका व्यक्त करताना आ. मंगेश चव्हाण म्हणाले की, दूध संघ निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल चालेल पण त्यात आ.एकनाथराव खडसे नकोत, त्यासाठी या निवडणुकीत १०० टक्के पॅनल राहणार असल्याची भूमिका आ. चव्हाण यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली.

जो है उसके साथ, जो नही उसके बिना : आ. एकनाथराव खडसे

दूध संघाच्या निवडणुकीबाबत आज काही लोकांशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच निवडणुकीतील पॅनलबाबत रचना ठरणार आहे. सर्वपक्षीय पॅनलबाबत जो है उसके साथ , जो नही उसके बिना अशा शब्दात भूमिका व्यक्त करीत दूध संघाच्या निवडणुकीत उतरण्याचे संकेत आ. एकनाथराव खडसे यांनी दिले आहेत.