‘जे रामाचे नाही ते कामाचे नाही’, मुख्यमंत्री शिंदेंनी कुणावर साधला निशाणा

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून मुंबईतील दादर परिसरातून वडाळ्यातील राम मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते. यावेळी “जे रामाचे नाही ते कामाचे नाही” असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. या रॅलीत मुख्यमंत्र्यांसह राहुल शेवाळे, किरण पावसकर, दीपक केसरकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक असून तो सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला पाहिजे. आज करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले. आज हजारो-लाखो लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.