जळगाव : ट्रेडींगमध्ये सातत्याने लाखोंच्या फसवणुकीच्या घटना होत असतानाही मोहाला नागरिक बळी पडत असत्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जळगावातील शिक्षकाला आमिष दाखवत ३४ लाखांमध्ये गंडवण्यात आले आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावच्या फॉरेस्ट कॉलनीत शिक्षक अनिल पांडुरंग दांडगे (४३) हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. १८ डिसेंबर २०२३ ते आजपावेतो इंडिया वदवणे (११) या ग्रुपवरील डॉ. आर्यन रेड्डी व ट्रेडींग अॅडव्हटायझर निता मोदी वरून आलेल्या मेसेज धारकाने ट्रेडींग इन्व्हेस्टमेंट करण्याच्या बहाण्याने ३४ लाख १६ हजार १११ रुपये इतकी रक्कम विश्वास संपादन करून मिळविली. मात्र कुठलाही परतावा न दिल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर ४ रोज अनिल दांडगे यांनी जळगाव सायबर पोलिसात तक्रार नोंदवली. तपास प्रभारी निरीक्षक किसनराव नजन-पाटील करीत आहेत.