---Advertisement---
तळोदा : दैनिक तरुण भारतने चार जुलैच्या अंकात तळोद्यात मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणांमुळे वाहतुककोंडी ! या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची दाखल घेत तळोदा नगरपालिकेकडून लागलीच पाच जुलै रोजी अतिक्रमणधारकांना नोटीसी बजावण्यात आल्या असून त्यांना अतिक्रमण काढून घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. नगरपालिकेच्या या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे
शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. यामुळे तळोदा नगरपालीकेने शनिवारी ५ रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यन्त शहादा रोडवरील गेटपासून शहरातील देशपांडे याच्या स्टूडीओ पर्यत ११२ अतिक्रमणधारकाना नोटीसी बजावल्या आहेत. नोटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा नागपालिका ते काढेल असा इशारा नोटिसीमध्ये देण्यात आला आहे.
---Advertisement---
दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील आधीच अरुंद रस्ते, त्यातच दुकानदारांनी ओट्यावर केलेले पायऱ्यांचे अतिक्रमण, तसेच रस्त्यावर बेशिस्तीने उभी राहणारी वाहने, हातगाडीवाले, फेरीवाले, फळ विक्रेते यांमुळे शहरातील मेन रोडने वाहनधारकांची रोज कोंडी होत असल्याचे प्रकार वाढले आहे.
यामुळे चालणेही मुश्किल होते. शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी वारंवार रस्ता मोकळा करतात. मात्र, हातगाडीवर वस्तू, फळ, पालेभाज्या विक्रेत्यांसह रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानदारांना वाहतूक पोलिसांकडून सूचना दिल्या जातात. मात्र, पुढे सपाट अशी परिस्थिती नेहमी होते. पाठ, मागे शहरातील काही दुकानदारांनी अतिक्रमणे केली आहेत. पालिकेने दिलेल्या बांधकाम परवानगीचे उल्लंघन करून पायऱ्यांचे तीन-चार फूट अतिक्रमण केलेले आहे. त्यात भर म्हणून रस्त्यावर पत्र्याचे पक्के कच्चे शेड उभे केले आहे. तर काहींनी कच्चे शेड उभे करून पत्रे टाकले आहेत. शिवाय, दुकानातील काही सामान रस्त्यावरच लावल्याचे चित्र दिसून येते.
असे असतांना नगरपालिकेने ११२ अतिक्रमणधारकांना नोटीस बजविल्याने अतिक्रमणधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.