---Advertisement---

‘तरुण भारत’ ‘नारीशक्ती मंच’ तर्फे आदिशक्तींचा सन्मान

by team
---Advertisement---


जळगाव : राष्ट्रीय विचाराने प्रेरित है ‘जळगाव तरुण भारत तर्फे नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबविले आतात विविध आयामांच्या माणमातून हे उपक्रम राबविले जातात त्यातीलच एक आयाम म्हणजे ‘नारीशक्ती मंच, महिलांनी महिलांसाठी सुरू केलेला असा हा उपक्रम असून, शनिवार, ८ मार्च रोजी ‘नारीशक्ती मंच’ आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शक्तीचा जागर करण्यात आला. महिता दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम पार पडला. यानिमित्त समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार कराण्यात आला दख्यान या सोहळ्याच्या वेळी सभागृह खच्च भरलेले होते.

जागतिक महिला दिनाच्यानिमिताने जळगाव तरुण भारत’च्या ‘नारीशक्ती मंचतर्फे शहरातील महाबळ रस्त्यावरील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता नारीशक्ती सन्मान सोहळा पार पडता. या वेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश दामू भोळे, केमावस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख डॉ. भरतदादा अमळकर, माजी महापीर सीमा भोळे, सर्जना पीडिया सोल्युशन्स प्रा. लि. ये कार्यकारी संचालक रवींद्र लड्ढा , रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊतच्या अध्यक्षा छाया पाटील ‘तरुण भारत’चे संपादक चंद्रशेखर जोशी उपस्थित होते.


महिला सन्मान कार्यक्रमाच्या सुरुवातीता भुसावळ येथील उद्योजिका मंगला भीमराव पाटीत व जळगाव येथील सपना राजपूत पांचा विशेष सत्कार करण्याता आता. यासह विविध क्षेत्रात उत्तेखनीय कामगिरी करणाऱ्या इतर महिलांचादेखीत सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याला जळगाव शहर मतदारसंघाचे आमदार सुरेश दामू भोळे, विमलपुष्पा फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. किशोर बाबुराव पाटीत, हॉटेत दि फोर सिझन्स रिक्रिएशन आणि चांडक कॅन्सर हॉस्पिटल हे नाट्य प्रयोगाचे प्रायोजक होते. सूत्रसंचालन प्रीती झारे यांनी केले तर आभार प्रदर्शन मीनल संजय नारखेडे यांनी केले.

धमाल विनोदी नाटकाने पिकला हंशा


महिलांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांना त्यांचे विचार व्यक्त करता यावे , त्यांचे प्रश्न मांडता यावेत यासाठी राष्ट्रीय विचारांच्या ‘तरुण भारत’ ने ‘नारीशक्ती मंच’ची स्थापना केली आहे. या मंचच्या माध्यमातून महिला दिनाचे औचित्य साधत महिला सन्मानासह महिलांसाठी ‘ऑल दि बेस्ट’ हे धमाल विनोदी नाटक प्रायोजित केले होते. देवेंद्र पेम हे नाटकाचे लेखक-दिग्दर्शक आहेत. यात मयुरेश पेम दिलीपच्या भूमिकेत मनमीत पेम चंद्रकांतच्या भूमिकेत, निखिल चव्हाण विजयच्या भूमिकेत, वनमाला वेदे ही मोहिनीच्या भूमिकेत, तर व्यवस्थापकाच्या भूमिकेत संदीप रावते यांनी आपली कला सादर केली. या कलाकारांनी आपल्या कर्तने या नाटकात जीव आणला आणि सभागृहातील प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडले.

‘तरुण भारत’ने वैचारिक वसा आणि वारसा जपला डॉ. भरतदादा अमळकर

केशवस्मृती प्रतिष्ठान हे समाजाशी बांधित आहे केशवस्मृतीचे अनेक उपक्रम माहेत. त्यातील एक म्हणजे जळगाव तरुण भारत’ वैचारिकतेचा वसा आणि वारसा म्हणून तरुण भारत चालविता जातो. महिलांचा आत्मसन्मान वाढावा म्हणून नारीशक्ती मंच काम करत आहे. केशवस्मृतीचे सर्व प्रकल्प हे समाज हितासाठी कार्य करतात. त्यातता एक भाग म्हणजे विवेकानंद शाळा. या शाळेच्या माध्यमातून आम्ही आषाढी एकादशीला विद्यार्थ्यांची दिडी कादायता सुरुवात केली आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळादेखील दिंडी काढू लागल्या त्यातून आषाढीता एक अत्यंत दिंडीमय वातावरण जळगावमाये असते. जळगावचा एक वेगळा सांस्कृतिक रंग आहे. हा रंग टिकवून ठेवण्यासाठी केशवस्मृती प्रतिष्ठान प्रयत्न करत असते. ‘तरुण भारत’देखील हा त्यातलা एक प्रयोग आहे. महिता घरातील काम सांभाळून आपले सुप्त गुण जोपासतात महिलांच्या या सुप्त गुणांना वाव देण्याचा उद्देश नारीशक्तीचा आहे. सन २००० पर्यंत मागच्या ३०० वर्षात समाजात सामाजिक भौतिक आणि वैज्ञानिक बदल झाले. त्याहून अधिक बदल गेल्या २० वर्षांत झाले. म्हणजेच समाजातील बदलाची गती अत्यंत जास्त आहे त्यामुळे सर्व बंधूंनी जाणीवपूर्वक अपल्या घरातील माता-भगिनींना समाजाच्या या प्रवाहात पुढे आणले पाहिजे, असे आवाहन केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख डॉ. भरतदादा अमळकर यांनी केले.

महिलांच्या सप्त गुणांना वाव मिळावा म्हणून नारीशक्ती मंचची स्थापना – रवींद्र लट्टा


दै. तरुण ‘भारत हे राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेले वृत्तपत्र आाहे. तरुण भारत समाजाच्या हितासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवित असते त्याचाच एक उपक्रम म्हणजे नारीशक्ती मंच हा होय. महिलांच्या सुत गुणांना वाव मिळावा म्हणून या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. महिला सशक्तीकरणासाठी ‘नारीशक्ती मंच’चा प्रयत्न आहे. या मंचच्या माध्यमातून आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहितीसर्जन मीडिया सोल्युशन्स प्रा. लि.चे कार्यकारी संचालक रवींद्र लड्डा यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment