तुम्हालापण येत असतील कर्जाचे असे संदेश तर सावधान! नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

जळगाव :  इंडियाला कर्जमाफीची ऑफर देऊन कर्जदारांना भुरळ घालणाऱ्या व दिशाभूल • करणाऱ्या जाहिराती निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही – जाहिराती संदेशावर ग्राहकांनी विश्वास र ठेवू नये, यापासून सावध रहावे, असे आवाहन आरबीआयकडून करण्यात न आले आहेत. प्रसिध्दीपत्रकात म्हटले की, कर्जमाफीसंदर्भात काही संस्था समाज माध्यमाच्या प्लॅटफॉर्मवर (फेसबुक,इन्टाग्राम, यू-ट्यूब चॅनल आणि बनावट वेबसाइट) यावर अनेक मोहिमांचे न सक्रियपणे प्रचार करीत असल्याचे न दिसून आले आहे. अशा संस्थांना कोणत्याही अधिकाराशिवाय कर्जमाफी प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी सेवा शुल्क

पोलीस ठाण्यात कळवा माहिती
खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या समाजमाध्यमातील बँकाविषयाची खोट्या प्रचार मोहिमांना बळी पडू नये. खोट्या घटना आढळल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी किंवा तक्रार नोंदवावी असे परिपत्रक आरबीआयमार्फत जारी करण्यात आली आहे. खोट्या प्रचार मोहिमा करणाऱ्या संस्थेच्या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रणव झा यांनी केले आहे.

आकारत असल्याच्या बातम्या आहेत.ज्यामुळे बँकाना आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता तारणावर त्यांचे अधिकार लागू करण्यासाठी बँकांच्या कामकाजात अडथळा येतो. बँकासह इतर वित्तीय संस्थांची थकबाकी भरण्याची गरज नाही, असा चुकीचा अर्थ अशा संस्था देत आहेत. अशा कृतीमुळे वित्तीय संस्थांची स्थिरता आणि सर्वात महत्वाचे ठेवीदारांच्या हितास बाधा येत आहे. यामुळे हे देखील लक्षात घेतले जाऊ शकते. अशा संस्थांशी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी संबंध ठेवल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होवू शकते.