जळगाव: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बोचरी थंडीचा अनुभव रशहरवासियांना येतोय. परंतु थंडीचा गारवा अधिक वाढणार असून दिवसादेखील थंडीची तिव्रता जाणवणार आहे. त्यामुळे दिवसा स्वेटर, मफलर परिधान करुन घराबाहेर पडावे लागत आहे. ही शितलहर ३१ डिसेंबरपर्यत राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. मंगळवारी जीएस ग्राउंडवर स्वेटर घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसले. मंगळवार १९ ते शनिवार ३० डिसेंबरपर्यंत हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला असून वातावरण कोरडे असणार आहे. त्यामुळे थंडीची तिव्र लाट येण्याचे संकेत दिले आहेत. शहरात थंडीची तिव्रता अधिक जाणवणार असल्याचा परिचय सोमवार रात्रीपासून शहरवासियांना येऊ लागला आहे. मंगळवार १९ रोजी दिवसभर वातावरण थंड जाणवले.शालेय चिमुकल्यांची कसरत पहाटे लवकर उठून शाळेत जाण्याची लगभग असते. सकाळच्याप्रार्थनेला हजेरी लागावी म्हणून त्यांची दररोज धावपळ होते. सध्या कडाक्याच्या थंडीतही ते शाळा गाठताना दिसत आहेत. स्वेटर, कानटोपी, शुज अशा पेहरावात ते थंडीपासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडत असले तरी सकाळी उबदार कपड्यांचा वापर करावा
पालकांनी मंगळवारी व्यक्त केली.
लवकर शाळेत पोहोचण्यासाठी त्यांना थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीच्या दिवसात सकाळच्या वेळेत या बालकांना, मुलांना दिलासा मिळावा, अशी भावना काही
गरम कपडे घालून पडा बाहेर थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपडे परिधान करुन घराबाहेर पडावे लागणार आहे. गारव्यामुळे
आरोग्यावर शित लहरीचा विपरित परिणाम होण्याचा इशारा वैद्यकीय सल्लागारांनी दिला असून डोळे, कान, नाक, गळा यावर शितलहरीचा अधिक परिणाम होण्याचा धोका असतो. त्यामुळे घराबाहेर पडताना प्रत्येकाला खबरदारी घ्यावी लागणार आहे.
थंडीपासून बचाव करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शीतलहरीत उबदार कपडे परिधान केले पाहिजेत. खूप थंडी असल्याने रक्त भिसरण होण्यात अडथळा येतो. सर्दी होण्याची भिती असते. यासाठी गरम पाणी सेवन करावे, गरम पदार्थ खाण्यासाठी वापरात असावेत. नाक-कानाला शितल लहर लागणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.
– डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव