---Advertisement---

धक्कादायक! जळगावात पुन्हा एकदा रॅगिंग, आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याला दारू पाजून मारहाण

by team
---Advertisement---

Jalgaon Crime News:  शहरातील शिरसोली रस्त्यावरील मुलांच्या वसतिगृहात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ही घटना ५ एप्रिल रोजी मध्यरात्री घडली असून ,शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला ‘इंटर्नशीप’करणाऱ्याने खासगी वसतिगृहात नेत दारू पाजून बेदम मारहाण केली. संबंधिताने पोलिसांकडे तक्रार दिली होती. नंतर मात्र त्याने तेथे माघार घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, आयुर्वेद महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला ‘इंटर्नशीप’ र्च करणाऱ्याने खासगी वसतिगृहात नेत दारू पाजून बेदम मारहाण केली. इतकेच नव्हेतर विद्यार्थ्याच्या मांडीवर न धारदार चाकूने वार करून त्याला डी गंभीर जखमी केले. पीडित विद्यार्थी हा आयुर्वेदच्या शेवटच्या वर्षाला असून मारहाण करणारा मुलगा हा इंटर्नशीप करीत आहे.

तो गेल्यावर्षी जीएस (महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी) होता. यंदा पीडित विद्यार्थ्यांची जीएस म्हणून नियुक्त्ती झाली आहे. मारहाणीनंतर त्यांनी ‘तुझे हातपाय कसे तोडतात ते दाखवतो’ असे म्हणत त्याला दोनजण दुचाकीवरून शहरात घेऊन गेले. काही वेळ फिरवल्यानंतर त्याला मध्यरात्री खोलीवर सोडले. तेथे त्याने घडलेली घटना रुम पार्टनरला सांगितली. त्यांनी रात्रीच महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment