जळगाव : मामाच्या गावाला आलेल्या तसेच नुकताच दहावीच्या वर्गात गेलेल्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शुक्रवार, १० रोजी कुसुंबा येथे सकाळी अकरा वाजता घडली. स्वप्नील दीपक पाटील असे मयताचे नाव आहे.नुकत्याच शाळांना सुट्या लागल्याने स्वप्नील हा कुसुंबा येथे मामाच्या गावाला आला होता.
शुक्रवारी गल्लीतील सर्व मुले खेळत असताना तो घरी आला. त्यांनतर वरच्या मजल्यावरील रुममध्ये गेला. दरम्यान त्याच्या आजीने स्वप्नील याला आवाज दिला. त्यानंतर त्या वरच्या मजल्यावर जावून आवाज दिला. त्यानंतर दरवाजा ठोकला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. आजीने आवाज देत शेजाऱ्यांना बोलविले.
त्यानंतर दरवाजा उघडून पाहिले असता स्वप्नीलने गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. या धक्कादायक घटनेने नातेवाईकांसह कुटुंबियांना जबर धक्का बसला. कुसुंब्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. बेशुध्दावस्थेत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.