जळगाव : जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील म हायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शिवतीर्थ मैदान (जी. एस. ग्राउंड) येथे शुक्रवार १० मे रोजी सायंकाळी ७ वाजता सभा होणार आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारासाठी महायुतीची जिल्ह्यात पहिलीच सभा होत असल्याने नितीन गडकरी यांच्या सभेची उत्सुकता महायुतीच्या पदाधिकाऱ्यासह मतदारांमध्ये दिसून
येत आहे.
सभेला स्मिता वाघ व रक्षा खडसे हे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे दोन्ही उमेदवार उपस्थित राहणार असून राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महायुतीचे समन्वयक जिल्ह्यातील आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे पाचोरा भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील, पारोळा – एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील, माजी खासदार ए. टी. पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आम दार साहेबराव पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार साहेबराव घोडे, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, माजी आमदार रणधीर सावरकर, भाजपाचे प्रदेश चिटणीस अजय भोळे,
जळगाव लोकसभा प्रम ख डॉ. राधेश्याम चौधरी, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष संजय पवार, भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, रावसाहेब पाटील, वासुदेव पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, मीनल पाटील, सोनाली नारायण पाटील, शिवसेनेच्या सरिता कोल्हे, गणेश सोनवणे, आरपीआय (आठवले) चे आनंद खरात, अनिल अडकमोल, (कवाडे गट) चे राजू मोरे, कुंदन काळे, विनोद देशमुख, मिलिंद सोनवणे, श्याम कोगटा, म ाजी महापौर भारती सोनवणे, महेश पाटील, आशिष सपकाळे, भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, महानगर सरचिटणीस अमित भाटीया, महेश जोशी, अरविंद देशम ख, ज्योतीताई निंभोरे, जितेंद्र मराठे हे सभेला उपस्थित राहणार आहेत.