जळगाव: लोकसभा निवडणूक बिनचूक पार पाडण्यासाठी जळगावचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सात टप्यात प्रशिक्षण दिले आहे. त्या प्रशिक्षणावा शेवट कर्मचाऱ्यांच्या लेखी परीक्षेत होणार आहे. या परीक्षेला ७० टक्क्यांवर गुण मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुणपत्रक देऊन गौरव केला जाणार आहे. ७० टक्क्यांपेक्षा कमी मिळतील त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागेल व या परीक्षेतून बाहेर पडणारा अधिकारी, कर्मचारी मात्र अख्या निवडणूक प्रक्रिया जन्मभर विसरणार नाही.
असा हा अनोखा पॅटर्न अधिकारी, कर्मचारी यांच्या मध्ये विश्वास निर्माण करणारा ठरणार आहे.कशी आहे ही प्रशिक्षण प्रक्रिया या प्रशिक्षण प्रक्रियेत निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीदरम्यान या निवडणूक प्रक्रियांतील प्रत्येक टप्प्याचा अत्यंत सूक्ष्म पणे या अध्यापन सत्रात समावेश आहे. त्यात सर्वांनी सहभाग घेणे अनिवार्य असून अध्यापनाचे स्वरूप व्याख्यान मालिका, ऑडिओ, व्हिडीओ क्लिप, ऑनलाईन आणि ऑफलाईन संसाधनांचा तसेच निवडणूक आयोगाकडून प्रदान करण्यात आलेले हॅण्डबुक्सचा प्रक्रिया समजून घेण्यासाठी वापर करता येईल.
चर्चासत्र
निवडणूक प्रक्रियेदरम्यानची आव्हाने सम जून घेण्यासाठी नियम व कार्यपद्धतीबाबत चर्चा करणे आणि केस स्टडीजचे विश्लेषण तसेच ही कार्यपद्धती सहज सुलभतेने अवगत होण्यासाठी आपापसात चर्चा करण्याचा टप्पा पण आहे.
शंकानिरसन सत्र
सर्व बाबींचा अभ्यास करून स्वयंशिक्षण मॉड्यूल पूर्ण करून शंका निरसन सत्र तसेच आवश्यकतेनुसार मार्गदर्शन व स्पष्टीकरणासाठी हेल्पडेस्कचा करण्याची मुभा आहे. वापर
या प्रशिक्षणात चौथ्या टप्प्यात प्रात्यक्षिके असून निवडणुकीच्या पूर्वी आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व क्रियाकलपांच्या प्रात्यक्षिकांना उपस्थित राहून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (ईव्हीएम) आणि इतर आवश्यक साधनांसह प्रात्यक्षिक सत्रांमध्ये सहभागी होणे अनिवार्य असेल.
या मॉकड्रिलमध्ये प्रत्येक गटाला एक स्लॉट आहे. जेणेकरून निवडणूक प्रक्रियांचे अनुकरण हा त्यामागचा उद्देश आहे. एवढेच नव्हेतर कौशल्य आणि तत्परता वाढविण्यासाठी सतत सराव करायचा आहे तोंडी परीक्षाअध्यापन, चर्चा, प्रात्यक्षिक, मॉकड्रिल नंतर सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून आयोजित केलेल्या मूल्यांकनासाठी तयारी करायची आहे. या मूल्यांकनावेळी तोंडी परीक्षा होईल व निवडणुकीच्या दिवसातील कामांसाठी सज्ज असल्याबाबतची तयारी दाखवावी लागणार आहे.
हे सर्व सहा टप्प्यांनंतर सातवा टप्पा इव्हीएम / व्हीव्हीपॅट वापराचे मूल्यांकनासाठी लेखी परीक्षा होणार आहे. त्यात निवडणूक कर्तव्यावरील प्रावीण्य प्राप्त अधिकारी म्हणून ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. एवढे गुण मिळाले नाहीत तर पुन्हा प्रशिक्षणास हजर राहावे लागणार आहे. असा हा प्रशिक्षणाचा जळगाव पॅटर्न आहे.
यातून कोणाकडून चूक होऊ नये निवडणूक प्रक्रिया बिनचूक व्हावी हेच अभिप्रेत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. या सर्व प्रक्रियेत अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे तसेच सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांचे योगदान आहे आणि असणार असल्याचेही आयुष प्रसाद यांनी यावेळी सांगितले.