पावसाने दिलासा! जळगावला अतिवृष्टी; अनेक धरणातून विसर्ग

तरुण भारत लाईव्ह । १० सप्टेंबर २०२३। पश्चिम महाराष्ट्रासह खानदेशात पावसाचा जोर असून मराठवाड्यातही चांगला पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. नाशिक जळगाव पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्याने या धरणातून विसर्ग सुरू झाल्याने जायकवाडी व उज्जनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाने एकूण धरणांच्या सरासरी पाणी साठ्यात सहा टक्के वाढ झाली आहे.

पावसाचा जोर खानदेशात जास्त असून जळगाव व नाशिक जिल्ह्यातील धरणातून विसर्ग सुरू आहे. गंगापूर सह विविध धरणातून विसर्ग सुरू असल्याने जायकवाडीच्या नाथसागर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे गोदाकाच्या मराठवाड्याच्या आशा पल्लवीत झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात केल्या २४ तासात तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर २३ मंडळात दम धारा बरसल्या असून या पावसामुळे धरणांसह नदी नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आहे. भुसावळ नजीक असलेल्या हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे हातनुर धरणाचे जवळपास १८ दरवाजे उघडण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर कमी झाल्याने गंगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे गंगापूर धरण ९५ टक्के भरल्याने काल धरणातून 9,८८ क्युसेक  विसर्ग सुरू करण्यात आला होता. शनिवारी तो ५४३२ करण्यात आला आहे. दारणा धरणातून होणारा विसर्ग मात्र वाढवण्यात आला आहे असून सध्या१८६८ क्यूसेक करण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यातही अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला.

कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. कोयनेचा पाणीसाठा ८६ टीएमसीच्या उंबरठा वर पोहोचला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातही चांगला पाऊस झाल्याने धरणे भरली आहेत. पुणे जिल्ह्यातील धरणातून विसर्ग सुरू असल्याने उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संततधार पाऊस पडत आहे.