जळगाव: कंपनीच्या पीएफ योजनेत थकबाकी होती. सेटलमेंट करण्याच्या मोबदल्यात एका व्यावसायिकाकडून २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. सीबीआय पथकाने येथील पीएफ कार्यालयावर मंगळवार, दि. ८ रोजी संध्याकाळी छापा टाकला. या प्रकरणी भविष्य निर्वाह निधी ( पीएफ ) कार्यालयाचे मुख्य वित्त व लेखाधिकारी रमन वामन पवार (वय ५८, रा. जळगाव) यांना अटक करण्यात आली. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावाने कंपनी (फर्म) असून त्या माध्यमातून कामगारांचा पुरवठा केला जातो. या कंपनीचे लेखा परीक्षण संदर्भात त्रुटी असल्याची पीएफ कार्यालयाकडून तक्रारदार यांना नोटीस बजावण्यात अली होती.
राज ठाकरेंचा काँग्रेसला मोठा धक्का ! ‘या’ दोन नेत्यांचा होणार मनसेत प्रवेश
मार्च २०२३ च्या पीएफच्या पेमेंटमध्ये चूक आहेत. तसेच उणिवा आहेत, असे सांगण्यात आले होते. कंपनीचा रिपोर्ट योग्यतेच्या मोबदल्यात मुख्य लेखाधिकारी पवार यानी ५० हजारांची लाच मिळण्याची मागणी केली होती. तडजोडअंती ( सेटलमेंट ) २५ हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी या प्रकरणी पुणे सीबीआय कार्यालयाकडे तक्रार दिली. त्यानुसार सीबीआयच्या पथकाने छापा टाकून वित्त अधिकाऱ्याला ताब्यात घेतले.