जळगाव । काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पाऊस राज्यात पुन्हा सक्रिय झालाय. आगामी चार दिवस राज्यात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील २१ ऑगस्टपर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.
यंदा राज्यातील जवळपास सर्वच भागांत समाधानकारक पाऊस झाल्या असून, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. गेले काही दिवस पाऊस नसल्याने राज्यात सर्वत्र उन आणि उकाड्याने लोक हैरान झाले होते. आता पुन्हा पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
पुढील ३ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. साधारणपणे पुढील आठवड्यात वरुणराजा दुपारी संध्याकाळी वरुणराजा हजेरी लावेल अशी शक्यता हवामनातज्ज्ञ के एस होसळीकर यांनी वर्तवलीय. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील आठवड्यापासून पावसाचे पुनरागमन होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.
दरम्यान, गेले काही दिवस पावसाने दडी मारल्यामुले जळगावकर उन आणि उकाडा आशा दोन्ही समस्यांशी झुंजत होते. मात्र, हवामान खात्याने जळगाव जिल्ह्याला २१ ऑगस्ट पर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सोमवारी दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बसरल्याने उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळाला.