पैशांचा तगादा लांबविण्यासाठी घरात चोरीचा केला बनाव पोलिसांच्या तपासातून रहस्य उलगडले; महिलेविरुद्ध गुन्हा

जळगाव : जिल्ह्यातील तळेगाव येथे ४ एप्रिल २०२४ रोजी चोरट्यांनी कुलूप तोडून २ लाख ४९ हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासात चक्र फिरवित ही चोरी नव्हे तर महिलेनेच चोरी झाल्याचा बनाव केल्याचा मामला समोर आला आहे. हात उसनवारीने घेतलेल्या लोकांचा तगादा काही दिवस रोखता यावा, या मानसिकेतून महिलेने स्वतःच चोरीचा प्लॅन केला. फिर्याद दिली. मात्र प्रत्यक्षात चोरी झाल्याची घटना घडलीच नाही. खोटा गुन्हा दाखल केला. तसेच पोलीस यंत्रणेला वेठीस धरले म्हणून या महिलेवरच गुन्हा दाखल झाला.

मीनाबाई पडवळकर या शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी २ एप्रिल रोजी शेतातील कापूस विकला. त्यातून त्यांना रोख रक्कम मिळाली होती. ४ एप्रिल रात्री ९ ते ५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे तळेगाव येथील राहते घराचे कुलूप तोडत घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कोठीतून सोन्याचे दागिने, रोकड असा २ लाख ४९ हजार किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. तक्रारीवरुन याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

चाळीसगाव उपविभागाचे अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी या गुन्ह्याच्या शोध कामी तपासाच्या सूचना दिल्या. त्यानंतर तपास चक्र फिरू लागले. मूळ फिर्यादी महिला तसेच साक्षीदार यांच्या घटनेसंदर्भात सांगण्यात विसंगत समोर आली. त्यामुळे फिर्यादीच्या सांगण्यावर संशय बळावला. सखोल तपास पुन्हा सुरू केला. तपासा चौकशीच्या माहितीनुसार मीनाबाई पडवळकर यांनी जानेवारी २०२४ मध्ये कापूस विकला होता. हात उसनवारीने घेतलेले पैशांची परतफेड त्यांनी या पैशातून केली होती. काही साक्षीदारांच्या माहितीनुसार कापूस विकल्यानंतरही त्यांना उधारीचे पैसे परत केले नाहीत. यासाठी महिलेकडे त्यांनी वारंवार पैशांची मागणीही केली होती. प्रत्येकी वेळी महिला तुमचे पैसे देते, असे सांगून वेळ मारुन नेत राहिल्या.

यामुळे महिलेच्या तक्रारीबद्दल संशय बळावला. कापूस विक्रीतून त्यांना जो पैसा मिळाला त्यातून त्यांनी काही लोकांना परत केला. तसेच गावातील पाच एकर शेती ताबेगहाण ठेवली होती. त्याचे पैसे त्यांनी रोख स्वरुपात दिले. देणे घेण्यात त्यांचे सर्व पैसे संपले. उधारीने घेतलेले बी बियाणे, खते, तसेच हातउसनवारीचे पैसे देण्याचे राहून गेले. या लोकांचा तगादा टाळण्यासाठी महिलेने चोरीचा बनाव घडवूनक्सझ*