तरुण लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२२ । जळगावातील एका तरुणाला नवविवाहिता दहाच दिवसात गंडवून पळून गेल्याची घटना घडली आहे. लग्नाच्या दहाच दिवसात या महिलेने तरुणाला फसवलं आणि भावाला भेटण्याच्या बहाण्याने मुंबईत बस्थानावरून पळ ठोकला. या तरुणाने महिलेला लग्नासाठी अडीच लाख रौप्ये दिले होते. मात्र, या प्रकरणी तब्ब्ल सात महिन्यानंतर तरुणाच्या तक्रारीवरून शनिपेठ पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील कांचननगर परिसरात शैलेंद्र किशनलाल सारस्वत (वय 46) हे व्यावसायीक राहतात. त्यांचा 2007 मध्ये लग्न होवून घटस्फोट झाला होता. त्यानंतर 2020 मध्ये त्यांना शाम गोपीलाल ओझा यांनी सोनी रा. बेळगाव या व्यक्तीने त्याच्या लग्नासाठी चांगले स्थळ आणले आहे असे सांगितले. त्यानुसार जानेवारी 2022 मध्ये त्यांनी सारस्वत त्यांच्या मोबाईलवर काही मुलींचे फोटो पाठविले.
त्यातील अर्पना नावाच्या मुलीचा शैलेंद्र सारस्वत यांना फोटो आवडल्याने त्यांनी दि. 21 एप्रिल 2022 रोजी सोनी यांच्यासोबत बालणी केली. तसेच तील वडील नसून ती व्यवस्थीत संसार करेल अशी हमी देखील दिली होती. परंतु लग्नासाठी त्यांना 3 लाख 40 हजार रुपये लागतील असे सांगितले. परंतु ही रक्कम जास्त होत असल्याने शाम ओझा यांनी सोनी यांच्याशी बोलून तडजोड करीत 2 लाख 61 हजार रुपये सारस्वत यांनी मान्य केले. त्यानुसार अगाऊ रक्कम म्हणून शैलेंद्र सारस्वत यांनी 20 हजार रुपये सोनी याच्या मुलीच्या बँक खात्यावर दि. 23 एप्रिल रोजी ट्रान्सफर केले होते. त्यानंतर लग्नापर्यंत वेळोवेळी पैसे टाकले होते, आणि लग्नाच्या दिवशी 7 हजार 500 रुपये रोख स्वरुपात असे एकूण 2 लाख 61 हजार रुपये त्यांनी उकळले.
पैसे ट्रान्सर केल्यानंतर दि. 25 एप्रिल रोजी शैलेंद्र सारस्वत हे त्यांची आई मैनाबाई, चुलत भाऊ राजेंद्र पृथ्वीराज सारस्वत, शाम ओझा व चुलत मावशी यांच्यासह खासगी वाहनाने कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील शास्त्रीनगर येथील सोनी यांच्या घरी गेले. याठिकाणी शैलेंद्र यांनी मुलीला पाहिले आणि पसंत केले. यावेळी तीने तिचे नाव अर्पना चंद्रकांत नाईक (वय-33, रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असे संगितले. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी त्यांनी वरमाळा टाकून विवाह केला होता.
शैलेंद्र व अपर्णा हे तिच्या भावाला भेटण्यासाठी दि. 2 मे रोजी दादरला पोहचले. त्याठिकाणी शैलेंद्र हे तिकीट काढत असतांना पत्नीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी शैलेंद्र यांनी थांबविले असता, त्या विवाहितेने शैलेंद्रशी वाद घालीत माझ्या मागे येवू नको नाहीतर चपलेने मारीन अशी धमकी देत शिवीगाळ करीत तेथून निघून गेली. याप्रकरणी माटुंगा पोलिसात हरविल्याची तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.
या प्रकाराबाबत सारस्वत यांनी प्रकाश सोनी, माधूरी चव्हाण त्या विवाहितेचा मामा यांना कळविले असल्याने त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. तसेच सोनी याने शैलेंद्र सारस्वत यांना धमकी देखील दिली. याप्रकरणी प्रकाश सोनी रा. बेळगाव व अर्पना चंद्रकांत नाईक रा. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण हे करीत आहे.