---Advertisement---

बाप रे..! सोने- चांदीने मोडले आता पर्यंतचे सर्व रेकॉर्ड, जळगावातील सुर्वण बाजारात ‘इतका’ आहे भाव

by team
---Advertisement---

जळगाव : जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. देशांतर्गत बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव 700 रुपयांनी वाढला आहे. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा दर ७३,८०० रुपये आहे. चांदीचा दरही उच्चांकी पातळीवर व्यवहार करत आहे. चांदी 89,200 रुपयांवर व्यवहार करत आहे.

जळगाववातील सुवर्ण बाजारातील भाव
सोने चांदी दरात चढउतार दिसून येत आहे. या आठवड्यात चांदी दराने विक्रमी पातळी गाठली आहे. जळगाव सुवर्णपेठेत चांदीच्या भावात शुक्रवारी एकाच दिवसात एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ती ८७ हजार ४०० रुपये प्रति किलो अशा विक्रमी दरावर पोहचली. चांदीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव ठरला आहे. सोन्याचे भाव ७३ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment