भंगार बाजारातील काही दुकानांना भीषण आग !

सुमित देशमुख जळगाव

 

जळगाव : शहरातील अजिंठा चौफुली वर लागून असलेल्या भंगार बाजारातील काही दुकानांना आज सकाळी आग लागली. त्या ठिकाणी असलेली जुनी टायर, लोट गाडी , लाकडी वस्तू, भंगार गाड्यांची सीट , हे आगीत जळून खाक झाले. भंगार बाजारात असलेली दुकाने आणि असलेले अतिक्रमण जास्त असल्याने आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे पाण्याचे बंब यांना जागा न मिळाल्याने आग वाढत राहिली . यात लाखो रुपयाचे नुकसान झाले . मात्र ही आग कशामुळे लागली हे कुणीच सांगू शकत नाही . दुकानदारांना विचारणा केली असता कोणी शॉर्टसर्किटने झाली असं म्हणतात तर , कचऱ्याला आग लावली होती म्हणून ती आग वाढली असेही सांगितले जात आहे .

या भंगार बाजारात खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण सुद्धा झालेले असून या ठिकाणी भंगार झालेल्या जुन्या फोर व्हीलर, टू व्हीलर, लाकडी फर्निचर, जुनी टायर अशा विविध भंगार वस्तूंनी या ठिकाणी शेकडो दुकानांचे अतिक्रमण वाढल्याने आग ही आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक बंब कर्मचारी व तेथील दुकानदार नागरिक यांना खूप तारेवरची कसरत करावी लागली आणि तब्बल तीन तासानंतर ही आग आटोक्यात आली . या ठिकाणी मनपा अग्निशामक दलातर्फे गेल्या पाच तासापासून आग विझवण्याचा प्रयत्न सुरूच होते. सहा बंबांनी आग विझवून आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग भिजवण्यात त्यांना सतत व्यत्यय येत होता .

पाच तासानंतर आग विझवण्यास मनपा अग्निशामक कर्मचारी शशिकांत बारी , विक्रांत घोडेस्वार, संजय तायडे , निवांत इंगळे , निलेश सुर्वे , प्रभाकर सोनवणे , गिरीश खडके व इतर कर्मचारी यांना यश मिळाले.