भुसावळ : चारचाकी वाहनातून तोंडाला मास्क बांधून आलेल्या तिधा दरोडेखोरांनी वाहनाच्या काचा फोडून व तिघांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून तब्बल एक कोटी ६० लाख रुपयांची रोकड लांबवत्याची सिनेस्टाईल घटना धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ शनिवार, १७ रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. भरदिवसा पडलेल्या दरोड्याने जिल्हाभरात खळबळ उडाली असून दरोडेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेले वाहन हे फैजपूर येथून चोरल्याचे स्पष्ट असून दरोडेखोरांनी पाळत ठेवून नियोजनबद्धरीत्या दरोडा टाकल्याचे स्पष्ट आहे.
सिनेस्टाईल एक कोटी ६० लाख लुटले धरणगाव तालुक्यातील पिंप्री
येथे दुर्गेश इम्पेक्स नामक जिनिंग आहे. शनिवारी कापसाचे पेमेंट करावयाचे असल्याने जळगाव येथील बँकेतून एक कोटी ६० लाखांची रोकड जिनिंगचे कॅशियर यांनी काढले. सोबतीला चालक व जिनिंगमालकाशी संबंधित एक असे तिघे चारचाकी वाहनाने पिंप्री येथे येण्यासाठी निधात्यानंतर शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास मुसळी फाट्याजवळील निलॉन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाखाली लाल रंगाच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली व काही क्षणातच स्कॉर्पिओतून तोंडाला मास्कलावलेले ३० ते ३५ वयोगटातील तीन संशयित उतरते व त्यांनी दुर्गेश जिनिंग संबंधित असलेल्या वाहनाची काच फोडून वाहनातील कॅशियर, चालक व अन्य एकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकल्याने तिघे प्रचंड हादरले व काही क्षणात तिघा दरोडेखोरांनी वाहनातील कापडी पिशव्यांमध्ये असलेली एक कोटी ६० लाखांची रोकड घेवून अन्य मारोती इको वाहनाने धूम ठोकली. घटनास्थळापासून काही अंतरावर इको वाहनही सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.