भाजपने चार राज्यांमध्ये निवडणूक प्रभारी केले नियुक्त ; महाराष्ट्रासह या राज्यांचा आहे समावेश

भाजपने सोमवारी महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड  आणि जम्मू आणि काश्मिर या  चार राज्यांतील निवडणूक प्रभारींची घोषणा केली.  केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे महाराष्ट्राची , केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे हरियाणाची, केंद्रीय मंत्री शिवराज सिह चौहाण यांच्याकडे झारखंडची आणि जी. किशन रेड्डी यांच्याकडे जम्मू आणि काश्मीरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पक्षाने या राज्यांचे सहप्रभारीही नियुक्त केले आहेत. महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार बिप्लब कुमार देब यांची हरियाणामध्ये सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  झारखंडमध्ये मुख्यमंत्री डॉ. हिंमत विश्व सरमा  यांना सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह हि नियुक्ती सोमवार १७ जून रोजी केली आहे.