तरुण लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२२ । मुंबईकडून खेडच्या दिशेने जाणार्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळल्याची घटना घडली. हा अपघात मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर धामणदेवी गावाच्या हद्दीत घडला. यात चालकासह ६ जण जखमी झाल्याची माहिती आहे.
सूत्रानुसार, सतीश जगताप (३५, रा. संभाजीनगर, कुर्ला, मुंबई) हे कामानिमित्त कोकणात निघाले होते. कारमध्ये त्यांच्यासोबत इतर पाच लोकही होते. मात्र धामणदेवी परिसरातील दत्तवाडी येथे पोहोचले असता सतीश जगताप यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या दरीत कोसळली.
जखमींचे नाव
या अपघातात चालक सतीश जगताप हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. तसंच दीपाली कर्नाळे (६५), दामोदर कर्नाळे (७०), साक्षी कर्नाळे (४२), स्वराज कर्नाळे (१२), राजेश कर्नाळे (४८) यांना किरकोळ दुखापत झाल्याने सर्वांना तात्काळ रायगड पोलादपूर ग्रामीण रूग्णालय येथे औषधोपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.