मधमाशांच्या हल्ल्यात तीन तरुण गंभीर जखमी

सोयगाव:  तालुक्यातील वेताळवाडी किल्ल्यावर मधमाशांच्या पोळला दगड मारल्याने मधमाशा तुटून पडल्या. या घटनेत तीन पर्यटक तरुण गंभीर जखमी झाले. यावेळी एकच गोंधळ उडाला. योगेश शंकर इंगळे (वय २४), प्रभाकर लक्ष्मण नागणे (वय २६) व रोमन नंदकिशोर आरके (वय २५) तिन्ही रा. सिल्लोड अशी जखमींची नावे आहेत. सोयगावपासून तीन किलोम ीटरवर अतिशय डोंगराळ भागामध्ये निसर्गाच्या पर्वत रांगेमध्ये वसलेला वेताळवाडी किल्ला आहे. येथे दररोज अनेक पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात.

वेताळवाडी किल्ल्याच्या मधोमध असलेल्या कपारीमध्ये शेकडो मधम ाशांचे पोळ आहे. दरम्यान, सिल्लोड शहरातील तीन पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेले होते. तेव्हा मधमाशांच्या पोळला दगड मारल्यामुळे मधमाशांनी तिन्ही पर्यटकांवर एकच हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले. किल्ल्यावरील घटना व रोमन नंदकिशोर आरके (वय २५) तिन्ही रा. सिल्लोड अशी जखमी तरुणांची नाव आहे. मधमाशांनी एकच हल्ला चढवल्याने पर्यटकांनी जोराने किरकाळ्या मारल्या. तेव्हा वेताळवाडी येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुरेश जाधव, समाजसेवक राजू माळी, रघुनाथ बावस्कर, संजय राऊत, रवींद्र मोरे हे तरुण हळदा या गावाहून लग्न सम ारंभ आटोपून येत होते.

वेताळवाडी किल्ल्यावर काहीतरी घटना घडली, असे निदर्शनास आले अन् त्यांनी वेताळवाडी किल्ल्यांवर धाव घेतली. बाजूला पडलेले पोते जखमींच्या अंगावर टाकत तिन्ही तरुणांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक जी.बी. खंदारे, सुनील वानखेडे यांनी तत्काळ उपचार सुरू केले.