महाराष्ट्र : राज्यात सध्या अवकाळी पावसाचे संकट कायम असून अवकाळीचं संकट नेमकं कधी दूर होणार? याची वाट बळीराजा पाहत आहेत. अशातच हवामान खात्याने शनिवार आणि रविवारी पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबत काही भागात गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये 21 मे पर्यंत जोरदार वारे, वादळ आणि हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.रविवारपर्यंत दोन्ही जिल्ह्यांत ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.सोमवार आणि मंगळवार दोन्ही जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील हवामानाबाबतही विभागाने ताजी माहिती दिली आहे. राज्यात मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल
जळगावात उन्हाचा चटका कायम
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविला असला तर जिल्ह्यात उन्हाचा चटका मात्र कायम आहे. जिल्ह्याचा उन्हाचा पारा ४२ अंशावर गेल्याने प्रचंड उष्णता जाणवत आहे. यामुळे जळगावकर होरपळून निघत आहे. यामुळे आता जळगावकरांना मान्सूनच्या पावसाची उत्सुकता लागली आहे.