महिलेस कोट्यावधी रुपयांना गंडा घालणारा सायबर ठग गजाआड, गुन्हा दाखल

जळगाव : ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करुन प्रचंड नफा कमविण्याचे अमिष दाखवून येथील महिलेस एक कोटीहून अधिक रक्कमेला चुना लावणारा सायबर ठगाला गुजरात राज्यातून सायबर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. राजाराम छोलाराम चौधरी असे संशयिताचे नाव आहे.

जळगाव शहरातील हरेश्वरनगरातील महिलेस तिच्या व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांक एका ग्रुपमध्ये जोडून तीन संशयितांनी मेसेज केले. ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा कमवा, असे अमिष दाखविले. त्यानुसार महिलेसह तिच्या अन्य नातेवाईकांच्या नावावरील रक्कमा बँक खात्यातून वेळोवेळी संशयितांनी ऑनलाईन स्विकारले. एकूण १ कोटी ५ लाख २३ हजार ३४१ इतकी रक्कम या ठगानी हडप केली.

परंतु परतावा न मिळाल्याने महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी चार इसमाविरुध्द गुन्हा दाखल झाला. तपासात राजाराम चौधरी हा निष्पन्न झाला. पथकाने त्याला गुजरात येथून अटक केली. बुधवार, २२ रोजी त्याला जळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी अतंर्गत त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. अन्य त्यांच्या साथीदारांचा स सायबर पोलीस शोध घेत आहेत. तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत वि आहेत.